प्राचार्य कौतिकराव ठाले सरांनी उन्हातान्हात भटकणाऱ्या माझ्यासारख्या अनेक गरीब, होतकरू तरुणांना सांभाळलंय… म्हणून मला ते ‘आधारवड’ वाटतात!
आज ठाले सरांविषयी लिहिताना त्याच कृतज्ञतेचा मी नम्रपणे उच्चार करतोय. त्यांनी मला रोजीरोटीला लावलं. एवढंच नाही, तर गरिबी सोसताना अनुभवाला येणाऱ्या अपमानित जीवनाचा भूतकाळ विसरायला लावेल, असं सन्मानाचं जगणं माझ्या वाट्याला येण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांची पितृछाया आजतागायत माझ्यावर आहे. वयाच्या ८१व्या वर्षीही हेवा वाटावी, अशी त्यांची ऊर्जा आहे.......